Posts

विचारांचे वादळ

आज २० ऑगस्ट २०२५. गीता जाऊन ११ दिवस झाले. तिच्या जाण्याची खंत मनाला सतत सलत आहे. वाटलं होतं, ३-४ दिवसांचा राग-फुगवा जाईल आणि परत सगळं व्यवस्थित होईल. पण तसं लवकर होईल असं दिसत नाही. आज ती टाकळीला गेली. मागचे १० दिवस ती मीराकडे थांबली होती. इतके दिवस का थांबली बरं? ती नात्याबद्दल आशावादी होती का? की डुग्गुचा १८ तारखेला वाढदिवस होता आणि दोन दिवस सतत पाऊस पडत होता म्हणून तिने आज जायचा निर्णय घेतला? हे फक्त तिलाच माहीत. मला माहित आहे रागाच्या भरात मी इतके बोलायला नको होते,  हे सगळं पैशावरून झालंय. त्या पैशाचा माज नक्की नाही मला. असता तर मी ५ वर्ष पैसे पैसे करत असतो.  जे झालं त्याबद्दल मी माफी पण मागेल. फक्त गीताने पण शांत डोक्याने या पुढे विषय वाढणार नाही यासाठी मनापासून प्रयत्न करावे. मला आता तिने इथे यावंसं वाटतंय, पण तिलाही इथली थोडी तरी ओढ असावी. वाद झाले तर कधी तिने, कधी मी शांतपणे त्यातून मार्ग काढायला हवा. तिने कधीही टाकळीला पळ काढू नये. इशू असेल, तर वाद विसरून पुढे जावं. एकमेकांबद्दल मनातून नेहमी आदराची भावना असावी. मला काही ताण असेल तर तिने शांतपणे ऐकावं, आणि तिच्या मनात...

तत्त्वाचं भांडण आणि त्याला पैशाचा स्पर्श

 आज ९ ऑगस्ट, रक्षाबंधनचा सण. आज गीता मीराकडे जाणार होती. टाकळीवरून तिचा भाऊ, ताई आणि नाना येणार होते. त्यामुळे सकाळी सगळी तयारी उरकून ९ वाजता निघायचा प्लॅन होता. ९ वाजता मीराने मला रिमाइंडर कॉलसुद्धा केला. तेव्हा मी तिला अजून अर्धा–एक तास लागेल, अशी कल्पना दिली. आज गृहकर्जाचा हप्ता गीता पाठवणार होती. माझी अपेक्षा होती की ती मागच्या महिन्याचा हप्तासुद्धा पाठवेल. पण तिने फक्त या महिन्याचाच हप्ता पाठवला. मी तिला मागच्या महिन्याबद्दल विचारले, तेव्हा ती म्हणाली, “तो एक महिन्याचा हप्ता तू मॅनेज करू शकत नाहीस का?” मी तिला सांगितलं की माझा दर महिन्याचा खर्च पगारापेक्षा जास्त आहे, त्यामुळेच मी तुला मागतोय. नाहीतर मी घराचा हप्ता कधीच कमी केला असता, जर तू आधीच सांगितलं असतं तर. त्यावर ती म्हणाली, “तुला कमी पैसे पडत असतील तर तुझे SIP बंद कर.” हे ऐकून मला राग आला. मी “ठीक आहे, मी हप्ता बघून घेतो” असं सांगून बेडरूममधून बाहेर पडलो. यावर ती भयंकर चिडली. तिचा स्वभावच आहे—बोलताना कोणी मध्येच निघून गेला तर ती खूप चिडते. तिने तोंडाने काही बोललं नाही, पण तिचा चेहरा सगळं सांगत होता. मग शिरा खाऊन मी ख...

ईशान ९ महिन्याचा झाला

तारीख 22 मार्च २०२५ आज इशू तुला ९ महिने पूर्ण झाले. माझ्या बरोबर तर खऱ्या अर्थाने तू शेवटच्या दीड महिन्यापासून आहे. या दीड महिन्यात तू भरपूर आनंद दिलास. तुझं हसणं पाहिलं तर सगळा थकवा कुठल्या कुठे निघून जातो. तुझा time table तू अगदी सेट केलेस. सकाळी ६.३० ला उठणे.. आणि एकटाच खेळत बसने. त्यातच शी करणे. मग परत ३० मिनिटे झोपणे. परत एकदम फ्रेश उठणे.  तुझ्या आईने तुझ्या जेवणाची जी व्यवस्था केली आहे एखाद्या फाईव्ह स्टार हॉटेलच्या शेफ ला पण मागे पाडेल. तिच्या मुळेच तुला कधीच शी चा त्रास झाला नाही. ८ महिने पूर्ण व्हायला ३-४ दिवस बाकी असतील. तुला एक छोटी पाण्याची बाटली आणली होती. तू पहिल्या दिवशीच नळीने पाणी ओढून प्यायला लागलास. ते पाहून सगळेच थक्क झाले.  तुझी पायऱ्या चढ़तानाची ऊर्जा पाहून Usain Bolt ला पण उत्साह येईल. इथे जवळच गार्डन मध्ये एक गणपती मंदिर आहे त्याच्या पायऱ्या चढताना पाहून पाहणारे लोक पण कौतुक करत होते. काही छोट्या मोठ्या गोष्टी घडल्यात त्यामुळे तू बराच रडलास. तुझं रडणे खरंच कोणालाच सहन होत नव्हत. तुझा आहार कसा पौष्टिक आणि परिपूर्ण राहील याची तुझ्या आईने खूप काळजी घेत...

ऐकटेपणा

खरंच हा एकटेपणा काय असतो समजायला लागले आहे मला . जी गोष्ट आहे आपल्याकडे त्याचा विचार न करता जी नाही त्याची चिंता करत बसणे म्हणजे एकटेपणा असे वाटतेय दिवस २२ मे, शुक्रवार जी गोष्ट काल पर्यंत साशंक वाटत होती ती गोष्ट कळली ,, लग्नाची date १२ दिवसांपूर्वीची गोष्ट (Home Quarantine चा पहिला दिवस ), तिच्यात आणि माझ्यात बोलता बोलता खटकले त्या क्षणी मी ठरवले पुढचे काही दिवस शब्दांवर यावर घातलेला बरा. कारण माझा बोलका स्वभाव खटकत होता.आणि तिचा शांत आणि मोजके बोलणारा स्वभाव माझ्या स्वभावाला स्वीकारत नव्हता. काही काळ मी तिच्या msgs ला टाळले. पण नंतर न राहवून तिला "Lets speak less " म्हणून msg पाठवला. आणि नंतर "there is something needs to be  sorted  out , till then  we should hold  our horses "   हा पाठवला. खूप विचार केला होता मी. बोलायचे नाही म्हणून. कमी बोलायचे म्हणजे बोलायचे नाही असे नव्हता. पण माहित नाही कुठे माशी शिंकली,  याचा नेमका उलट परिणाम झाला. आमचे बोलणे बंद झाले. रोज थोडे बोलणारे आम्ही अक्षरशः msgs ला reply पण देणे टाळायला लागलो. त्याच वीक मध्य...

पहिली भेट

मला अजूनही आठवते आमची ती पहिली भेट ज्यात ती आली होती साधारण अर्धा तास late बघता बघता ती माझ्या पुढ्यात आली. तिच्या बद्दलची माझी उत्सुकता अजूनच वाढत गेली. आम्ही दिवसातले तिथे पाहिलेच customer होतो सोबत मोकळे table आणि Chair इतकेच होते    दोघांना थोडा वेळ  set होण्यातच गेला त्यातही एकमेकांकडे निरखून पाहण्यातच गेला  थोडे comfortable झाल्यावर  आम्ही चहा order kela त्या साठी पण waitor ने 10 मिनिट उशीर केला. Next order काय करायची हा यक्षप्रश्न होता पिझ्झा, sandwitch, fries असे बरेच  option होते त्यातही Fries आम्ही prefer केले पण संपवताना तेही आमच्या जीवावर आले. तिथे आमच्या बऱ्याच गप्पा गोष्टी झाल्या मी माझे आणि ती तिचे सांगत गेलो आवडी निवडी, movies, college असे बरेच काही discuss झाले थोडे तिने next भेटीसाठी पण राखून ठेवले . मला अजुन आठवते, तिचे ते निरागस बोलणे, दिलखुलास हसणे डोळ्यात एकटक बघणे आणि मधून मधून भुवया वर उडवून खूनावणे. तशी ती थोडी awkward feel करत होती but विचारल्या ला प्रश्नांना honestly उत्तर पण देत होती. बोलता बोलता दोन तास कसे गेले,कळलेच नाही आता द...

Are your money habits hurting your marriage

Image

Portfolio and cashflow-5

Image
Add caption