ऐकटेपणा
खरंच हा एकटेपणा काय असतो समजायला लागले आहे मला .
जी गोष्ट आहे आपल्याकडे त्याचा विचार न करता जी नाही त्याची चिंता करत बसणे म्हणजे एकटेपणा असे वाटतेय
दिवस २२ मे, शुक्रवार जी गोष्ट काल पर्यंत साशंक वाटत होती ती गोष्ट कळली ,, लग्नाची date
१२ दिवसांपूर्वीची गोष्ट (Home Quarantine चा पहिला दिवस ), तिच्यात आणि माझ्यात बोलता बोलता खटकले त्या क्षणी मी ठरवले पुढचे काही दिवस शब्दांवर यावर घातलेला बरा. कारण माझा बोलका स्वभाव खटकत होता.आणि तिचा शांत आणि मोजके बोलणारा स्वभाव माझ्या स्वभावाला स्वीकारत नव्हता. काही काळ मी तिच्या msgs ला टाळले. पण नंतर न राहवून तिला "Lets speak less " म्हणून msg पाठवला. आणि नंतर "there is something needs to be sorted out , till then we should hold our horses " हा पाठवला. खूप विचार केला होता मी. बोलायचे नाही म्हणून. कमी बोलायचे म्हणजे बोलायचे नाही असे नव्हता. पण माहित नाही कुठे माशी शिंकली, याचा नेमका उलट परिणाम झाला. आमचे बोलणे बंद झाले. रोज थोडे बोलणारे आम्ही अक्षरशः msgs ला reply पण देणे टाळायला लागलो. त्याच वीक मध्ये म्हणजे गुरुवारी, आई ला चक्कर चा त्रास जाणवू लागला. आम्ही सगळे त्याच टेन्शन मध्ये. चक्कर एवढी भयानक होती कि तिला बसता पण येत नव्हते. त्या दिवशी सकाळी ८ वाजता दवाखान्यातून तिला घरी आणले तरी चक्कर थांबेना.त्यादिवशी बाबा आणि मी सगळे घरातले काम बघितले. आईला वेळच्या वेळी औषधे दिली. त्रास इतका जाणवत होता कि दिवसात तिने जास्त वेळ आराम केला. पण फरक काही जाणवला नाही. दुसऱ्या दिवशी परत डॉक्टर कडून दाखवूनआणले त्यावेळेस डॉक्टर ने ५ डायस च्या गोळ्या दिल्या. त्यामुळे थोडा फरक जाणवू लागला. पण काही केल्या कारण आजाराचे कारण कळेना.
इकडे तिचे आणि माझे शीतयुद्ध चालू होते. काही तरी तिच्या मनात चालले होते. तिच्या मनात खूप गोंधळ झाला होता. त्यात मी तिचा एक कॉल receive केला नाही थोडा जेवताना व्यस्त होतो म्हणून. माहित नव्हते काय बोलायचे होते तिला. मी callback पण केला पण तिने receive केला नाही. may be ती झोपली असेल.
दुसऱ्या दिवशी गुड मॉर्निंग ला गुड डे रिप्लाय आला तेव्हा थोडी शंका आली. त्या नंतर तिचा ३ दिवसाने msg आला."आपल्या कडे हा लास्ट चान्स आहे , विचार करून सांग, लग्नाची तारीख नाना fix करायला गेलेत, बघायचे का नको. " मी क्षणाचा हि विचार न करता बघू असा replay केला आणि तिचे मत विचारले. "आपल्याला बोलतान पण जमत नाही lifetime कसे जमेल", हे अनपेक्षित उत्तर मला मिळाले.त्यावर मी खूप विचार करू नकोस आणि हे होत राहते असे सांगितले.यावर तिला पटले नाही. तिने सरळ "का नाही हे विचार करण्या सारखे, मला काही आपले future दिसत नाही " असे ताडकन सांगितले. मी सरळ तिला सहमत नसल्याचे सांगितले. आणि हे दूर असल्यामुळे होत आहे असे पण सांगितले, आणि last Sunday हा असाच एक होता. त्यावर तिने "मला तुझ्या बोलण्याची पद्धत पटत नाही, मला वाटत नाही it will work out " असे सांगितले. मी तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला हे सगळे मोबाईल वर बोलणे कारण असेल. पण तिला काही पटले नाही. तिचा मुख्य मुद्दा होता माझ्या संभाषण कला बद्दल. जी ती मला नेहमी सुधार म्हणायची.उदाहरणार्थ बोलताना कमी बोलणे आणि मुद्देसूद बोलणे, विनाकारण बोलणे टाळावे. वगैरे बोलताना टाळावे. आणि बरेच बाकीचे जे तिने अजून सांगितले नसेल.
तिने आपल्या conversation ला base च नाही असे सांगितले,हे नीट नसेल तर कसे जमणार आपले यावर पण भर दिला.खरे तर हे धक्कादायक होत, ६ महिन्यांनंतर हे कानी पडणे म्हणजे कानात उकळते तेल ओतल्यासारखे होत. मी तिला शांतपणे माझ्याकडून लग्नाला काही अडचण नसल्याचे सांगितले आणि तिलाच यावर विचार करायला सांगितले. हे खरंच होत. मी स्पष्ट होतो लग्नाबद्दल. तिच्याच मनात काही संभ्रम निर्माण झाले होतं. मी तिला स्पष्ट सांगितले "निर्णय तुझा आहे लग्न करायचे का नाही. आणि शेवटचे ६ महिने पण आठवण करण्यास सांगितले"(खरे तर आत्ता हा प्रश्न निर्माण होणे म्हणजे जोडीदाराची खात्री नसण्यासारखे झाले). "आपल्या दोघांना पण माहित आहे दोघात काय कमी आहे, आणि बऱ्याच वेळा या गोष्टी नात्यात matter नाही करत "तिला हे पण सांगायला मी विसरलो नाही. त्यावर तिचा फक्त Amm उत्तर आले.
मला असे वाटते तो पूर्ण दिवस ती हाच विचार करत असावी.दुसऱ्या दिवशी तिच्या स्टेटस वॉर comment
म्हणून "तुला अजून तुझे उत्तर मिळाले नाही का "" असा खोचक प्रश्न केला, यावर तिने पण धारधार उत्तर दिले "मला इतकाच माहित आहे , तुझा नेभळे पणा असाच राहिला तर आपली भांडणे होतील, आणि मला माहित आहे मला राग येतो, नाही tolerate होत काही गोष्टी ". खरंतर या वर मला भयंकर राग आला होता. पण मी खूप विचार करून उत्तर द्यायचे टाळले. मला माहित होत काही वेळा शब्दाने शब्दाला उत्तर दिले कि शब्द कमी होत नाही तर ते वाढतात. सगळे मी तिच्या वर टाकले. मला माहित होत मी कुठे तरी compromise करायला पाहिजे.तिला तिचा space द्यायचे मी ठरवले.
दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी जवळच्या डॉक्टर कडे आईची शुगर चेक केली , ती कमी (57) भरली. डॉक्टर ने काही गोळ्या दिल्या सोबत काही टेस्ट करण्या संबंधी पण सुचवले.
गुरुवारी दुपारी टाकळी वरून call आला. लग्नाची Date ३१ मे Fix करू म्हणून. आम्हीही जास्त आढेवेढे न घेता करू फायनल म्हणून सांगितले. आता सगळे क्लिअर वाटायला लागले. गीता ने पण होकार दिला असेल आणि ती पण बऱ्यापैकी लग्नाबद्दल ठाम असेल. दाजीशी बोलणी करून परमिशन आणि मेडिकल सर्टिफिकेट बद्दल काढायचे ठरले.खूप काही करायचे होत, नवरदेवाचा ड्रेस हा पण बराच मोठा विषय होता. यात सगळ्यात जास्त काळजी वाटत होती आईच्या तब्येतीची. ती काही सुधारण्याचा नाव घेत नव्हती.
शुक्रवारी सकाळी डॉक्टर कडे जाऊन उपाशी पोटी काही टेस्ट करायच्या होत्या, सगळ्या टेस्ट केल्या,आणि संध्याकाळी रिपोर्ट Collect करण्यास सांगितले. त्यात फक्त Cholesterol जास्त आहे हे समजले(१२६, पाहिजे होते १०० खाली ). डॉक्टर ने काही गोळ्या आणि सिरप लिहून दिले आणि 2 दिवसांनी परत बोलावले.
मला एक गोष्ट समजत होती गीता खुश नाही या लग्नासाठी,जे तिने मला आधी सांगितले आहे. कदाचित तिने हा निर्णय दबावात पण घेतला असेल. मला बोलावे लागेल तिच्याशी एकदा.आम्ही एवढ्या लोकांना involve केले आहे. आता सगळे भावनांनी पण गुंतले आहे.
जर हे ती खरंच मनापासून नसेल करत तर.......
या विचाराने माझ्या मनात काळजीने घर केले आहे आणि यामुळे कशात पण माझे मन लागत नाही.

Harrah's Lake Tahoe Casino & Hotel
ReplyDeleteHarrah's 하남 출장안마 Lake Tahoe Casino 군포 출장안마 & Hotel. 777 Harrah's Blvd, 전주 출장안마 Stateline, NV 89103. Get Directions · (702) 414-5000. Call Now · 경주 출장마사지 More Info. Hours, Accepts Credit Cards, 하남 출장마사지