Posts

Showing posts from May, 2020

ऐकटेपणा

खरंच हा एकटेपणा काय असतो समजायला लागले आहे मला . जी गोष्ट आहे आपल्याकडे त्याचा विचार न करता जी नाही त्याची चिंता करत बसणे म्हणजे एकटेपणा असे वाटतेय दिवस २२ मे, शुक्रवार जी गोष्ट काल पर्यंत साशंक वाटत होती ती गोष्ट कळली ,, लग्नाची date १२ दिवसांपूर्वीची गोष्ट (Home Quarantine चा पहिला दिवस ), तिच्यात आणि माझ्यात बोलता बोलता खटकले त्या क्षणी मी ठरवले पुढचे काही दिवस शब्दांवर यावर घातलेला बरा. कारण माझा बोलका स्वभाव खटकत होता.आणि तिचा शांत आणि मोजके बोलणारा स्वभाव माझ्या स्वभावाला स्वीकारत नव्हता. काही काळ मी तिच्या msgs ला टाळले. पण नंतर न राहवून तिला "Lets speak less " म्हणून msg पाठवला. आणि नंतर "there is something needs to be  sorted  out , till then  we should hold  our horses "   हा पाठवला. खूप विचार केला होता मी. बोलायचे नाही म्हणून. कमी बोलायचे म्हणजे बोलायचे नाही असे नव्हता. पण माहित नाही कुठे माशी शिंकली,  याचा नेमका उलट परिणाम झाला. आमचे बोलणे बंद झाले. रोज थोडे बोलणारे आम्ही अक्षरशः msgs ला reply पण देणे टाळायला लागलो. त्याच वीक मध्य...