Posts

Showing posts from August, 2025

विचारांचे वादळ

आज २० ऑगस्ट २०२५. गीता जाऊन ११ दिवस झाले. तिच्या जाण्याची खंत मनाला सतत सलत आहे. वाटलं होतं, ३-४ दिवसांचा राग-फुगवा जाईल आणि परत सगळं व्यवस्थित होईल. पण तसं लवकर होईल असं दिसत नाही. आज ती टाकळीला गेली. मागचे १० दिवस ती मीराकडे थांबली होती. इतके दिवस का थांबली बरं? ती नात्याबद्दल आशावादी होती का? की डुग्गुचा १८ तारखेला वाढदिवस होता आणि दोन दिवस सतत पाऊस पडत होता म्हणून तिने आज जायचा निर्णय घेतला? हे फक्त तिलाच माहीत. मला माहित आहे रागाच्या भरात मी इतके बोलायला नको होते,  हे सगळं पैशावरून झालंय. त्या पैशाचा माज नक्की नाही मला. असता तर मी ५ वर्ष पैसे पैसे करत असतो.  जे झालं त्याबद्दल मी माफी पण मागेल. फक्त गीताने पण शांत डोक्याने या पुढे विषय वाढणार नाही यासाठी मनापासून प्रयत्न करावे. मला आता तिने इथे यावंसं वाटतंय, पण तिलाही इथली थोडी तरी ओढ असावी. वाद झाले तर कधी तिने, कधी मी शांतपणे त्यातून मार्ग काढायला हवा. तिने कधीही टाकळीला पळ काढू नये. इशू असेल, तर वाद विसरून पुढे जावं. एकमेकांबद्दल मनातून नेहमी आदराची भावना असावी. मला काही ताण असेल तर तिने शांतपणे ऐकावं, आणि तिच्या मनात...

तत्त्वाचं भांडण आणि त्याला पैशाचा स्पर्श

 आज ९ ऑगस्ट, रक्षाबंधनचा सण. आज गीता मीराकडे जाणार होती. टाकळीवरून तिचा भाऊ, ताई आणि नाना येणार होते. त्यामुळे सकाळी सगळी तयारी उरकून ९ वाजता निघायचा प्लॅन होता. ९ वाजता मीराने मला रिमाइंडर कॉलसुद्धा केला. तेव्हा मी तिला अजून अर्धा–एक तास लागेल, अशी कल्पना दिली. आज गृहकर्जाचा हप्ता गीता पाठवणार होती. माझी अपेक्षा होती की ती मागच्या महिन्याचा हप्तासुद्धा पाठवेल. पण तिने फक्त या महिन्याचाच हप्ता पाठवला. मी तिला मागच्या महिन्याबद्दल विचारले, तेव्हा ती म्हणाली, “तो एक महिन्याचा हप्ता तू मॅनेज करू शकत नाहीस का?” मी तिला सांगितलं की माझा दर महिन्याचा खर्च पगारापेक्षा जास्त आहे, त्यामुळेच मी तुला मागतोय. नाहीतर मी घराचा हप्ता कधीच कमी केला असता, जर तू आधीच सांगितलं असतं तर. त्यावर ती म्हणाली, “तुला कमी पैसे पडत असतील तर तुझे SIP बंद कर.” हे ऐकून मला राग आला. मी “ठीक आहे, मी हप्ता बघून घेतो” असं सांगून बेडरूममधून बाहेर पडलो. यावर ती भयंकर चिडली. तिचा स्वभावच आहे—बोलताना कोणी मध्येच निघून गेला तर ती खूप चिडते. तिने तोंडाने काही बोललं नाही, पण तिचा चेहरा सगळं सांगत होता. मग शिरा खाऊन मी ख...