ईशान ९ महिन्याचा झाला
तारीख 22 मार्च २०२५
आज इशू तुला ९ महिने पूर्ण झाले. माझ्या बरोबर तर खऱ्या अर्थाने तू शेवटच्या दीड महिन्यापासून आहे.
या दीड महिन्यात तू भरपूर आनंद दिलास. तुझं हसणं पाहिलं तर सगळा थकवा कुठल्या कुठे निघून जातो.
तुझा time table तू अगदी सेट केलेस. सकाळी ६.३० ला उठणे.. आणि एकटाच खेळत बसने. त्यातच शी करणे. मग परत ३० मिनिटे झोपणे. परत एकदम फ्रेश उठणे. तुझ्या आईने तुझ्या जेवणाची जी व्यवस्था केली आहे एखाद्या फाईव्ह स्टार हॉटेलच्या शेफ ला पण मागे पाडेल. तिच्या मुळेच तुला कधीच शी चा त्रास झाला नाही. ८ महिने पूर्ण व्हायला ३-४ दिवस बाकी असतील. तुला एक छोटी पाण्याची बाटली आणली होती. तू पहिल्या दिवशीच नळीने पाणी ओढून प्यायला लागलास. ते पाहून सगळेच थक्क झाले.
तुझी पायऱ्या चढ़तानाची ऊर्जा पाहून Usain Bolt ला पण उत्साह येईल. इथे जवळच गार्डन मध्ये एक गणपती मंदिर आहे त्याच्या पायऱ्या चढताना पाहून पाहणारे लोक पण कौतुक करत होते. काही छोट्या मोठ्या गोष्टी घडल्यात त्यामुळे तू बराच रडलास. तुझं रडणे खरंच कोणालाच सहन होत नव्हत. तुझा आहार कसा पौष्टिक आणि परिपूर्ण राहील याची तुझ्या आईने खूप काळजी घेतली . काजू , बदाम, खजूर, मखाना असलेली पेज, नाचणी, तांदूळ, रवा ची पेज, केळ, सफरचंद हे सगळं तिने आहारात समाविष्ट केला. दार १-२ तासाला तुला ती काही तरी भरवत होती. सगळे लोक बाळसं नाही म्हणत होते यामुळे तिने तुला काही कमी पडू दिले नाही . रात्री मी तिला दूध देणे तिने कमी करायला सांगितलं असतानाही ती ३-४ वेळा जेव्हा जेव्हा तू जागा व्हायचा तुला दूध देत होती आणि तू पण खूप भूक लागल्यासारखा चुटूचुटू पीत होता.
सुरवातीला रात्री काही दिवस दार १-२ तासांनी झोपेतच रडायचा. तेव्हा तुझ्या आईने आणि मी तुला परत शांत करायची जबाबदारी चोख पाडली. रात्री तू ३६० डिग्री मध्ये फिरतोस आणि फिरताना अडथळा आला कि भोंगा पसरतो. त्यामुळे तुला तुझा Space कमी पडणार नाही याची पण तुझ्या आईने काळजी घेतली होती. आजी आजोबा तर तुझ्या हसण्याचं कौतुक करताना थकत नसत. त्यांना तुझ्या बालक्रीडा पाहून खूपच आनंद व्हायचा. आमचे ऑफिस चे काम चालू असताना तुझ्या आजी आजोबानी खरंच थोडा पण विसावा घेतला नाही..आधी मधी आम्ही १५-२० मिनिटे तुला घेतले की आजोबा बाहेरच हॉल मध्ये वामकुक्षी घेऊन थकवा दूर करायचे.
तू खाताना कधी त्रास दिला नाहीस. पण खाताना तुला आम्ही मनोरंजन कमी पडू दिले नाही. कधी तू खाताना आम्ही पण वाटी घेऊन पाणी प्यायचो, कधी वेगवेगळ्या प्राण्यांचे आवाज काढून तुला डिस्ट्रक्ट करायचो. कधी बर्फी गाण्यावर डान्स करून तुला हसवायचो तर कधी ससा च गाणं गायचो. हे सगळं करून पण तू शेवटचं २ घास ठेवायचा.
तुला काही दिवसापूर्वी Walker आणला पण त्याचा उपयोग तू खुर्ची म्हणूनच केलास. काही दिवस आधी आजोबा आळंदी ला गेले होते तेव्हा त्यांनी तुला टोपी आणि ढोल आणला, ढोल तसा तुझ्या आकाराच्या मानाने बराच मोठा आहे. पण तुला मनोरंजन करण्यासाठी पुरेसा आहे. तुझ्या आईने स्ट्रिक्ट पणे टीव्ही वर बंदी आणली तरी मी आणि तुझ्या आजोबा ने IND vs NZ चॅम्पिअनस ट्रॉफी ची फायनल पहिली (थोडं घाबरूनच), IND जिंकल्याचा आनंद काही वेगळाच होता.
एक वृद्ध आजोबा भेटले गणपती मंदिर बाहेर. त्यांनी तुझा हात पाहिला, तेव्हा तुझ्या भविष्याबद्दल चांगले भाकीत केले आणि पाठीवर न मारण्यास पण सांगितले. तुझ्या आईचा हात पहिल्यावर शनी चा प्रकोप जावा म्हणून ५ शनिवार उपवास करण्यास सुचवले. कुतूहलाने मी पण माझा हात दाखवला. तेव्हा माझ्या हातावरच्या रेषा पाहून खूप संकटे असल्याचे सांगितले आणि त्यासाठी २१ शनिवार उपवास सांगितला. मला माहित नाही हे खरंआहे की नाही पण मला आता उपवास करावासा वाटू लागलाय. अंधश्रद्धा म्हणून नाही तर श्रद्धा आणि तब्येतीला होणार फायदा म्हणून.
एक गोष्ट सांगायची राहिली . तुला शु पँट मध्ये करायला अजिबात आवडत नाही. म्हणजे तू झोपेतून जागा झालास की झोपत नाही कारण तुला शु करायची असते. गम्मत सांगायची झाली तर खाता खाता तू शी केलीस तर शेवटचे काही घास आईने संपवल्याशिवाय बाथरूम मध्ये नेले नाही. तिचा खाण्याचा आग्रह खरंच सोपा नव्हता, तुझी पँट घालताना सगळ्यांना नाकी नऊ यायचे. एक पाय घातला की दुसरा घालेपर्यंत पहिला बाहेर.. पँट घालणे म्हणजे दोघांचे काम असायचे. काही दिवस सकाळी तू जेव्हा उठायचा तेव्हा मी तुला सारेगमा चा रियाज करायला लावायचो(माहित नाही तुला त्यातला १% पण कळला असेल). नंतर मी ते बंद केला कारण तू काही उत्साह दाखवेना. कधी कधी तू माझ्याकडे येण्यासाठी झेप घ्याचा आणि तू माझ्या कुशीत विसावला ना त्यात काही तरी वेगळाच आनंद जाणवायचा, कदाचित आपला दोघांचं हे नातं काही तरी special आहे याची तू जाणीव करून द्यायचा. खरा सांगू का या दोन महिन्यात खरंच सगळ्यांच्या मनावर तू राज्य केलास.
Comments
Post a Comment